दिवस मतदानाचा
Monday, April 26, 2004
माझे हे तसे पहिलेच मतदान. ह्यापुर्वी मी कधिच मतदान केले नसल्याने, त्याबद्द्ल खुपच उत्सुक्ता होती. कोणाला मत दयायचे? का दयायचे? ह्याबद्द्ल मीत्रांबरोबर बरेच वाद घातल्याने पक्ष तर निच्षित झाला होता, आता फ़क्त मत द्यायचे तेवढे बाकी होते.
मित्रांसोबत मतदान केंद्रावर गेलो तर तिथे भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रांगेत उभा राहणार येवढ्यात आमच्या भागातिल नगरसेवक भॆटले. कधिही न दिसणारे हे लोक, आम्ही जसे ह्यांना सात जन्मापासुन ओळखतो आहोत अशा अभिभावाने अंगावर चाल करुन आले. अतिशय हसतमुखाने 'आम्हालाच मत द्या' अशी आवर्जुन विनवणी करुन गेले. बर्याच वेळाने आमचा नंबर लागला. हे बिहार नसल्यामूळे मतदान शांततेतच चालू होते. माझा नंबर आल्यावर मी आत गेलो. आतमधे तुरळक माणसे होती. नाव नोंदवून पोलींग बुथ मधे गेलो, एक साधि अशी मशिन समोर होती. त्याच्यावर उमेदवारांची नावे होती. अपेक्षित उमेदवाराला select करुन बाहेर आलो.
आठवडाभर आधिपासुन मी ह्यालाच वोट देणार सांगणारे मित्र आता अजिबात सांगायला तयार नव्हते कि कोणाला मत दिले. मिही म्हटलं, 'जाऊंदे आपणही नंतरच सांगुया, उगाच आपला उमेदवार निवडुन नाही आला तर?'. त्यापेक्षा निकाल आल्यावर सांगायला मोकळे कि 'मी सुद्दा ह्यालाच मत दिले होते!'
Posted by Sandesh
Email this!