रंग दे बसंती - Rang de Basanti
Monday, March 20, 2006
नुकताच 'रंग दे बसंती' पहिला. एकदम path breaking सिनेमा. अतिशय उच्च दर्जाचे मनोरंजन, तरी सुद्धा समाजाशी नाळ सांधलेला.
जेव्हा पासुन टि. व्हि. वर सिनेमाचे प्रोमोज यायला सुरुवात झाली होती तेव्हापासुनच उत्सुकता लागली होती, तेव्हाच लक्षात आले होते कि चित्रपट नक्कीच वेगळा असेल, आणि आहेही. असे वेगळ्या धाटणीचे , समाज जागृती करणारे सिनेमा यापुर्विही आले होते पण त्याना Art film चे लेबल लावून विशिष्ठ वर्गाची मक्तेदारी म्हणून पाहिले जायचे. रंग दे बसंती मात्र असा पहिलाच चित्रपट असेल जो सर्व वर्गांत लोकप्रिय होऊनसुद्धा सामाजीक संदेश तेवद्ढ्याच तिव्रपणे प्रेक्षकांच्या मनात बिंववत असेल.
हा सिनेमा नेहमीच्या धाटणीने न जाता नविनच वाटा धूंडाळतो व आपल्यालाही त्यात गुंतवून सोडतो. सिनेमा अगदी तरुण आहे. विषयातील वेगळेपण, चित्रिकरण, स्क्रिप्ट, कलाकारांचा अभिनय ह्या जमेच्या बाजू आहेतच त्यात A.R. चे संगीत जे ह्ळूहळू नसांमध्ये भिनते.
चित्रपटाची सगळ्यात भक्क्म बाजु म्हणजे कथा, जी आजच्या भारतीय तरूणांची मानसिकता दर्शवते. चित्रपटातील 'भगतसींग आदि क्रांतिकारांच्या भुमीकेसाठी्चा दिल्ली विश्वविद्द्यालयातील औडीशन्स' चा सिन आजच्या पिढीविषयी बरेच काही सांगुन जातो. एक गोष्ट सिनेमा ठळकपणे नोंदवतो की आजची तरुणाई आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेली तरुणाई ह्यात काहीही फरक नाही. जेवढ्या सहजतेने चित्रपट प्रेक्षकांना हसवतो तेवढ्याच ताकदिने रडवतोसुद्धा! सोनियाच्या (सोहा अली खान) तोंडचे 'मार डालॊ' वाक्य अंगावर काटा आणते. D.J. (आमीर) ची आपण काहिही करु शकत नसल्याची असाह्यता बेचैन करुन सोडते.
ह्या तरुणांचा कौलेज बौयज ते जहाल क्रांतिकारक हा प्रवास तुम्हाला आतुन हलवल्या शिवाय राहणार नाही ह्यात काडिचिही शंका नाही.
Propagate!
These icons link to social bookmarking sites where readers can share and discover new web pages.
Posted by Sandesh
Email this!
1 Comments on 'रंग दे बसंती - Rang de Basanti':
By Pratik Pandey, at 11:13 am, March 28, 2006
Post a Comment