T.M.T. (ठाणे परिवहन सेवा), रिक्क्षा आणि बाईक्स

Wednesday, May 11, 2005

जर तुम्ही ठाण्यात असाल तर ह्या तिन गोष्टिंपासून जरा दुरच रहा. ह्या तिन गोष्टिंचा काहिही भरवसा नाही. ह्या प्रत्येक यंत्राचा पायलट, नेहमीच स्वतःला श्रेष्ठ सिध्ट करण्याच्या प्रयत्नात असतो.

बस स्टंन्डवर उभ्या असणार्या रिक्क्षाला हॉर्न न देताच अलगद 'टच' करुन कसे बाजुला करावे, ह्याची कला टि. एम. टि. पायलटला अवगत असते. तसेच बाईकस्वारास नुसती हुलकावणी देवुन पाडून घालण्याची कला बेमालूमपणे रिक्क्षा पायलटला अवगत असते. आणि बाईक पायलट बद्द्ल तर विचारुच नका (हे बहुधा कॉलेज कुमारच असतातप). पाठी बसलेल्या षोडशीला भुलवण्यासाठी वाट्टेल त्या करामती करत असतात.

तेव्हा जरा जपून. असे ऎकण्यात आले आहे की आता ठाणे पोलिस रस्त्यावरुन चालणार्या पाद्चार्यांना सुध्दा हेल्मेट अपरिहार्य करणार आहेत! :)

Propagate! These icons link to social bookmarking sites where readers can share and discover new web pages.
Digg.com del.icio.us My Yahoo
Posted by Sandesh Email this!

0 Comments on 'T.M.T. (ठाणे परिवहन सेवा), रिक्क्षा आणि बाईक्स':

Post a Comment